Our Blog

हे चित्र बदलत का नाही?

अभिमन्यूप्रमाणे शेतकरी लुटीच्या शेती अर्थव्यवस्थेच्या चक्रव्युहात अडकत गेला. ही वस्तुस्थिती आहे. त्याची स्थिती, त्याची कारणं या विषयीची मांडणी खूप झालीय. आज गरज आहे ती या चक्राव्युहातून बाहेर पडण्यासाठी उपयुक्त ठरेल अशा मांडणीची आणि त्याच बरोबर ठोस कृतीशील कार्यक्रमाची. अशा मांडणीतून आलेला कृतीकार्यक्रमच पुढील वाटचालीसाठी उपयोगाचा ठरणार आहे

मार्ग दावूनी गेले आधी..

शेतकरी हा जगाचा पोशिंदा आहे. अन्नदाता आणि बळिराजा आहे. ही विशेषणे अनादीकालापासून दिली जात आहे. मात्र असं असूनही तो कायम दारिद्रयात आणि विपन्नावस्थेत का? याचं उत्तर शोधायचा प्रयत्न वेगवेगळ्या परिप्रेक्ष्यात जगभरातील अनेक विचारवंतांनी केला. शेती ही इतिहासातील मोठी फसवेगिरी आहे. शेतीतील वरकड उत्पन्न लुटण्याचाच जेत्यांचा इतिहास राहिला आहे. हाच निष्कर्ष पुन्हा पुन्हा समोर येतो.

चक्रव्यूह भेदू या- भाग 3

भारताला 1947 साली स्वातंत्र्य मिळाल्यानंतर देशासमोर जी आव्हाने उभी राहीली, त्यात सर्वात मोठे आव्हान भीषण अन्नधान्यटंचाईचे होते. नव्या सरकारने धोरण आखले.शेतकऱ्यांनी त्याला प्रतिसाद देत 80 च्या दशकात देशालाअन्नधान्याच्या बाबतीत केवळ स्वयंपूर्णच बनवले नाही तर जगातील 1 नंबरचा निर्यातदार बनवले. भिक्षेचा कटोरा घेणारा ही देशाची प्रतिमा बदलून देशाला अन्नधान्याच्या बाबतीत सक्षम बनवले. अन्नधान्य पिकवून कोट्यवधी जनतेच्या भुकेचा प्रश्न सोडविणाऱ्या शेतकऱ्याच्या पदरी निराशाच पडली. किरकोळ फरकाने त्याची आर्थिक स्थिती ‘जैसे थे’च राहिली. उत्पादन वाढले, पण शेतकऱ्यांचे उत्पन्नाचे काय? हा प्रश्न आजच्या मोबाईलक्रांतीच्या जगातही तसाच आहे.

बाजार स्वातंत्र्याची पहाट..

कोरोनामुळे शेतीचे पर्यायाने शेतकऱ्यांचे अनेक टप्प्यांत अतोनात नुकसान झाले. या अवघड काळातच खऱ्या अर्थाने मुल्य साखळ्यांचे महत्व अधोरेखित झाले. मुल्यसाखळ्या व्यवस्थित उभ्या राहिल्या नाही तर अशी संकटे सरकारही हाताळू शकत नाही.याची जाणीव सरकारसहीत सर्वच घटकांना झालीय.. कोरोना संकटाला स्विकारुन आपण चालत असतांनाच एकूणच व्यवस्थेच्या उभारणीसाठी केंद्र सरकारकडून २० लाख कोटीचे पॅकेज जाहीर झाले.