

ती स्वतः परदेशात गेली नाही, पण तिच्या ४० गुंठ्यांतली द्राक्षं परदेशात पोहोचली.
ज्या महिलेने वयाच्या २५ वर्षांपर्यंत शेतात पाऊलही ठेवलं नव्हतं, तीच आज अवघ्या ४० गुंठे जमिनीतून आपली शेतीची कमाई १.६३ लाखांवरून ११.९६ लाखांपर्यंत घेऊन गेली आहे. कमी जमीन, शेतीचा अनुभव नसलेली सुरुवात आणि त्यानंतर लाखोंपर्यंत पोहोचलेला हा प्रवास नक्कीच लक्ष वेधून घेणारा आहे. ही गोष्ट आहे खडक माळेगावच्या रेखा रमेश रायते यांची.
व्हिडिओ पहा: शेतीतल्या नवदुर्गा — रेखा रायते